Panjab dakh ; 72 तास जोरदार पावसाचे, चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा धो-धो
पंजाब डख यांच्या हवामान अंदाजानुसार, महाराष्ट्रात २८ ते ३० ऑगस्ट २०२५ या काळात चांगला पाऊस होनार आहे. काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होईल, तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडेल असा अंदाज पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे.
२८ ते ३० ऑगस्ट या काळात यवतमाळ, नांदेड, परभणी, लातूर, बीड, धाराशिव (उस्मानाबाद), सोलापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये तसेच कोकण आणि मुंबईत चांगला पाऊस अपेक्षित आहे होईल अशी माहिती डख यांनी दिली आहे.
Panjab dakh ; या तारखेपासून पाऊस कमी होनार..
३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या चार दिवसांमध्ये पावसाचा जोर थोडा कमी होईल. त्यानंतर ४ ते ७ सप्टेंबर या काळात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, धाराशिव, बीड, जालना, आणि छत्रपती संभाजीनगर येथे खूप पाऊस पडेल अशी माहिती पंजाबरावांनी दिलीय.
Panjab dakh ; सप्टेंबरमध्ये दुष्काळी भागांना दिलासा
अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त भागांमध्ये सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस पडेल, ज्यामुळे ओढे आणि नाले भरून वाहू शकतात असेही डख साहेब म्हनाले..
३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या काळात पाऊस कमी असल्याने शेतीतली कामे, जसे की तण काढणे आणि खत देणे, पूर्ण करून घ्यावीत कारण 4 सप्टेंबर पासून पुन्हा पावसाला सुरुवात होनार आहे. – पंजाब डख
आँगष्टपेक्षा सप्टेंबरमध्ये जास्त पाऊस
यावर्षी सप्टेंबरमध्ये ऑगस्टपेक्षा जास्त पाऊस होईल आणि २ नोव्हेंबरपासून थंडीला सुरुवात होईल असा अंदाज पंजाब डख यांनी वर्तवला आहे.