Manikrao khule ; पुढील पाच दिवस हवामान कसे राहिल – माणिकराव खुळे…

Manikrao khule ; पुढील पाच दिवस हवामान कसे राहिल – माणिकराव खुळे…

Manikrao khule ; हवामान विभागाचे माजी हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दि. 07/सप्टेंबर रोजी पुढील पाच दिवसांचा अंदाज वर्तवला आहे. खुळे म्हणतात की आजपासुन दि. (07/सप्टेंबर) पासून पुढील पाच दिवस पावसाची उघडीप आहे. पाहुया कोणत्या भागात पावसाची उघडीप असेल आणि कोणत्या भागात पावसाची शक्यता आहे..

07/ सप्टेंबर पासुन संपूर्ण मराठवाडा, खान्देश, नाशिक अ.नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यांत पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार दि. 11/सप्टेंबर पर्यंत पावसाची काहीशी उघडीप मिळण्याची शक्यता जाणवते. मुंबईसह कोकणात व विदर्भात मात्र ही उघडीप दि. 09/सप्टेंबर पासुन असेल असे माणिकराव खुळे यांनी सांगितले आहे.

या तारखेपासून पुन्हा पाऊस – माणिकराव खुळे

मुंबईसह संपूर्ण कोकण व मराठवाडा वगळता उर्वरित संपूर्ण विदर्भ,खान्देश व नाशिक अ.नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अश्या 21 जिल्ह्यांत शुक्रवार दि.12/ सप्टेंबरपासुन मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते. मुंबईसह संपूर्ण कोकण व मराठवाड्यातील 15 जिल्ह्यात मात्र ह्या दिवसात केवळ तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे .माणिकराव खुळे
Meteorologist (Retd) IMD Pune.

महत्त्वाच्या बातम्या, हवामान अंदाज, बाजारभाव, शेतकरी योजना, शेतीविषयक महत्त्वाची माहिती आणि इतर चालू घडामोडी पाहण्यासाठी आपल्या whatsaap ग्रुप मध्ये सहभागी व्हा… धन्यवाद

Leave a Comment