Havaman andaj ; आज या जिल्ह्यात मुसळधार, उद्यापासून राज्यातला पावसाचा जोर ओसरनार
राज्यातील काही भागातला पावसाचा जोर आज ओसरला आहे, मात्र उद्यापासून पावसाचा जोर आणखी ओसरणार असून पुढील तीन ते चार दिवस राज्यात पाऊस कमी होणार आहे. तुरळ ठिकाणीच हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय..
आज विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग घाटमाथा आणि कोकणात काही ठिकाणी मुसळधार ते मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय…
आज कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस होणार आहे, कुठे मुसळधार तर कुठे हलक्या पावसाची शक्यता आहे पाहूयात सविस्तर….
आज कोणत्या जिल्ह्यात
विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यात जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट असून नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय.
मराठवाड्यातील जालना संभाजीनगर आणि परभणी या जिल्ह्यातही हलक्या पावसाची शक्यता आज आहे.. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक या जिल्ह्यात जोरदार तर धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाचा येल्लो अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे.
संपूर्ण कोकण आणि घाटमाथ्यावरही मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असून या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Havaman andaj ; या ठिकाणी पावसाची विश्रांती…
मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव, हिंगोली, बीड तसेच सोलापूर, सांगली या जिल्ह्यात आज पावसाची उघडीप राहणार आसल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय…