राज्यात या तारखेनंतर पुन्हा पाऊस वाढनार, मानीकराव खुळे
माणिकराव खुळे (Meteorologist (Retd) IMD Pune) यांनी सप्टेंबर महिन्यात पाऊस कसा राहील,किती दिवस पाऊस आणि किती दिवस पावसाची उघडीप राहील याबाबत सविस्तर अंदाज व्यक्त केला आहे. मानीकराव खुळे यांनी दिलेला हवामानाचा अंदाज सविस्तर पाहुयात…
रविवार दि. ७ सप्टेंबर(पौर्णिमे) पर्यंत संपूर्ण कोकण, विदर्भ व खान्देशसह नाशिक जिल्ह्यात व संपूर्ण सह्याद्री घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
विशेषतः मुंबई, मुंबई उपनगर ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगांव, उत्तर छ. सं. नगर, जालना, अमरावती, अकोला, बुलढाणा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर ह्या जिल्ह्यात व संपूर्ण सह्याद्री घाटमाथ्यावर पावसाचा प्रभाव अधिक जाणवू शकतो.
या तारखेनंतर पावसाची उघडीप – मानीकराव खुळे
सोमवार दि. ८ सप्टेंबर ते शुक्रवार दि. १२ सप्टेंबर च्या पाच दिवसात पूर्व विदर्भ वगळता, मुंबई व संपूर्ण कोकण सहित उर्वरित महाराष्ट्रात उघडीपीची शक्यता जाणवते.
या तारखेपासून पुन्हा पावसाची शक्यता- खुळे
शनिवार दि. १३ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यानच्या आठ दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा दमदार पावसाची हजेरी लागू शकते, असे वाटते.
आज इतकेच!
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune