रामचंद्र साबळे अंदाज ; या आठवड्यात पाऊस कसा राहील ?
आजपासून शनिवार (ता.३१ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर) पर्यंत महाराष्ट्राच्या उत्तरेकडील पूर्व भागावर हवेचे दाब १००२ हेप्यपास्कल, मध्य व दक्षिण भागावर १००४ हेप्टापास्कल इतके कमी हवेचे दाब राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज (ता. ३१) चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत १० ते २० मि.मी. पावसाची शक्यता आहे.
या आठवड्यात कोकणातील सर्वच जिल्ह्यांत मध्यम, तर उत्तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत आज (ता.३१) हलक्या पावसाची शक्यता आहे. पश्चिम विदर्भ व मध्य विदर्भात हलक्या ते मध्यम राहील. पूर्व विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यांसह भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत मध्यम पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर पुणे व सातारा जिल्ह्यांत मध्यम तर सांगली, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
रामचंद्र साबळे अंदाज ; या आठवड्यात पाऊस कसा राहील ?
वाऱ्याची दिशा अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत उत्तरेकडून, तर उर्वरित जिल्ह्यात नैऋत्येकडून राहील. बीड, धाराशिव, लातूर व सोलापूर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १४ ते १६ कि.मी. राहील. बहुतांशी जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. तर काही जिल्ह्यात पूर्णतः ढगाळ राहील.
या आठवडाभर बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागात हवेचे दाब कमी राहतील. त्यामुळे तेथे ढग जमून पुढे महाराष्ट्राचे हवेच्या कमी दाबाचे क्षेत्राचे दिशेने वाहतील. त्यामुळे आठवडा अखेरपर्यंत पावसाची शक्यता कमी राहील. या आठवड्यात सोमवार (ता.१ सप्टेंबर) पासून ईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीचा मॉन्सून सुरू होईल. या आठवड्यापासून वाऱ्याच्या दिशेत बदल होण्यास सुरुवात होईल. वारे ईशान्येकडून दक्षिण दिशेने ढग वाहून आणतील व जेथे हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र असेल तेथे जोराचे पाऊस होतील. या पुढील काळात पावसात बराच काळ उघडीपही जाणवेल. त्यामुळे चांगला सूर्यप्रकाश मिळेल.
प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान पेरूजवळ १५ अंश सेल्सिअस, तर इक्वॅडोरजवळ ३० अंश सेल्सिअस इतके कमी राहील. त्यामुळे तेथे हवेचे दाब अधिक राहतील. हिंदी महासागरवरून पूर्वेकडे वारे वाहण्यास प्रतिबंध होईल. त्यामुळे यापुढेही पाऊस चालू राहील.