सोयाबीन शेवटची फवारणी, टपोरे दाने आणि भरपूर शेंगा…
सोयाबीनला शेवटची फवारणी कोनती करावी म्हनजे आळीच़ 100% नियंत्रण होईल आणि दाने टपोरे आणि वजनदार होतील…याबाबत सविस्तर माहिती या लेखात सविस्तर पाहूयात…
ही फवारणी सोयाबीनच्या फुलांचे शेंगांमध्ये रूपांतर झाल्यानंतर आणि दाणे भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान करावी. या फवारणीचा उद्देश शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण करणे, शेंगांचा आकार वाढवणे आणि दाणे टपोरे व वजनदार करणे हा आसनार आहे.
या फवारणीत जर अळींचा प्रादुर्भाव कमी असेल, तर प्रोफेनोफॉस किंवा ईमामेक्टीन सारखी स्वस्त कीटकनाशके वापरू शकता….जर अळींचा प्रादुर्भाव जास्त असेल, तर कोराजन, अँम्लिगो, बँराझाईड, फेम यापैकी एका किटकनाशकाचा वापर करू शकता..
जर दाण्यांचा आकार आणि वजन वाढन्यासाठी 13-0-45 या खताचा वापर करावा…यात 45% पोटॅश आणि 13% नायट्रोजन असतो .यामुळे दाण्यांचा आकार टपोरा होतो.
जर 13-0-45 उपलब्ध नसेल, तर 00-00-50 वापरू शकता, ज्यात 50% पोटॅश आणि 17.5% सल्फर (गंधक) असते. सल्फरमुळे सोयाबीनच्या दाण्यांमधील तेलाचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
शेवटच्या फवारणीत जास्त खर्चिक टॉनिक न वापरता, कमी खर्चात अळीनाशक आणि योग्य विद्राव्य खत यांचा वापर करून फवारणी घ्यावी, या शेवटच्या फवारणीत टाँनीक वापरून विनाकारण खर्च टाळावा…