लाडकी बहीण आँगष्टचा हप्ता लवकरच, आदीती तटकरे…

लाडकी बहीण आँगष्टचा हप्ता लवकरच, आदीती तटकरे…

 

Ladki Bahin Yojana August Installment Update: लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता कधी येणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आता याबाबत आदिती तटकरेंनी आँगष्टच्या हप्त्याची माहिती सांगितली आहे…

 

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याबाबत स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता ललकरच दिला जाईल, असं त्यांनी सांगितलं.

 

लाडकीच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट (Ladki Bahin Yojana Installment Update)

 

लाडकी बहीण योजनेत अजून ऑगस्टचा हप्ता दिलेला नाही. सप्टेंबर महिना सुरु झाला असला तरीही अद्याप ऑगस्टचेच पैसे महिलांना मिळाले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान याबाबत लवकरच माहिती दिली जाईल,असं सांगितलं जात आहे. सप्टेंबर महिना सुरु होऊन ५ दिवस झाले आहेत. तरीही अजून पैसे जमा झालेले नाहीत.

 

यामुळे सप्टेंबर आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत मात्र सध्या, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

 

ऑगस्टचा हप्ता लवकरच येणार,आदिती तटकरेंची माहिती

 

काल महिला व बालविकास मंत्री यांनी साम टीव्हीशी बोलताना ऑगस्टच्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. ‘लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता लवकरच दिला जाईल. लाडकी बहीण योजना अशीच यशस्वीरित्या सुरु ठेवण्याचा महायुती सरकारचा संकल्प आहे’. असं त्यांनी सांगितलं आहे.

Leave a Comment