रामचंद्र साबळे ; परतीचा पाऊस जोरदार बरसनार, पहा कधीपासून

रामचंद्र साबळे ; परतीचा पाऊस जोरदार बरसनार, पहा कधीपासून

 

जेष्ठ हवामानतज्ञ रामचंद्र साबळे यांनी परतीच्या पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. त्यानी दिलेला अंदाज आपण या लेखात सविस्तर पाहनार आहोत.

 

“हे वर्ष हवामानाच्या दृष्टीने खूप वेगळे आहे,” असे डॉ. साबळे यांनी स्पष्ट केले. “प्रशांत महासागरातील ‘ला निना’ (La Nina) प्रभावामुळे पावसाचे वितरण विस्कळीत झाले आहे. त्यामुळे काही ठिकाणी अतिवृष्टी, महापूर आणि ढगफुटी होत आहे, तर राहुरी, सिंदखेडा, बारामती, माजलगाव, शेवगाव, पाथर्डी यांसारख्या अनेक भागांत अजूनही पावसाचे प्रमाण कमी आहे. मात्र, येत्या काही दिवसांत या भागांतही पाऊस होईल…

 

परतीच्या मान्सूनला अद्याप सुरुवात झालेली नाही, त्याला थोडा वेळ आहे. मात्र यावर्षी परतीचा मान्सूनही चांगला होईल” आणि आँक्टोंबर आखेरपर्यंत परतीचा पाऊस बरसेल असा अंदाज साबळे यांनी व्यक्त केलाय…

पावसाचा जोर कमी होनार…रामचंद्र साबळे

 

५ सप्टेंबर (शुक्रवार) हवेचा दाब १००४ हेप्टापास्कल होईल, ज्यामुळे पावसाचा जोर थोडा कमी होईल. तरीही, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता कायम राहील असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी दिलाय…

 

६ सप्टेंबर (शनिवार) महाराष्ट्रावरील हवेचा दाब वाढून १००४ ते १००६ हे पास्कल, तर दक्षिणेत १००८ हे पास्कल होईल. यामुळे पावसाची तीव्रता कमी होईल आणि राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.

Leave a Comment