पंजाब डख ; परतीचा पाऊस येतोय, या तारखेपासून होनार सुरुवात…

पंजाब डख ; परतीचा पाऊस येतोय, या तारखेपासून होनार सुरुवात…

 

हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी परतीच्या पावसाबाबत एक सविस्तर असा अंदाज दिलेला आहे. तर पंजाबराव डख यांनी दिलेला परतीच्या पावसाचा सविस्तर अंदाज आपण या लेखात जाणून घेउयात…

 

पंजाब डक यांच्या अंदाजानुसार, १३ सप्टेंबरपासून महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये परतीचा पाऊस सक्रिय होईल. तेलंगणा, नांदेड, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये १३ सप्टेंबर रोजी पाऊस सुरू होईल आणि रात्रीपर्यंत तो अकोला, अमरावती, बुलढाणा, हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये पोहोचेल. १४ सप्टेंबर रोजी हा पाऊस मराठवाड्यात येईल, ज्यामुळे नांदेड, परभणी, लातूर, बीड, जालना, संभाजीनगर, धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडेल. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरातही येथे १३ सप्टेंबरच्या रात्रीपासून पावसाला सुरुवात होईल. १५ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस सक्रीय होईल असा अंदाज पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे.

 

शेतकऱ्यांनी 13 सप्टेंबर पर्यंत शेतीची सर्व कामे करून घ्यावी यामध्ये पिकाला खत घालने, खुरपणी, गवत काढणे, त्यानंतर मूग उडीदाची काढणी करणे ही सर्व कामे शेतकऱ्यांनी 13 सप्टेंबरच्या अगोदर करून घ्यावी… कारण 13 सप्टेंबर पासून परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे आणि राज्यात सर्वच भागामध्ये परतीचा पाऊस हा जोरदार बरसणार आहे असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.

 

13 सप्टेंबर पासून परतीचा पाऊस हा विदर्भ मराठवाड्यातून सुरुवात करेल. 14 तारखेला संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भात पूर्तीचा पाऊस चांगला जोर धरेल. त्यानंतर 15 सप्टेंबरला राज्यातील पूर्तीचा पावसाचा जोर आणखी वाढेल आणि तो आणखी काही भागांमध्ये दाखल होईल आणि 16 सप्टेंबर पर्यंत राज्यातील सर्व भागांमध्ये परतीचा पाऊस चांगला सक्रिय होईल. 17 सप्टेंबर पर्यंत याचा जोर कायम राहील अशी शक्यता पंजाबराव डख यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment