पंजाब डख अंदाज ; परतीचा पाऊस येतोय….तारीख पहा
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी परतीच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तर या लेखांमध्ये आपण पंजाबराव डख यांनी दिलेला परतीच्या पावसाचा अंदाज सविस्तर जाणून घेणार आहोत….
राज्यात 7 सप्टेंबर पर्यंत राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये भाग बदलत पाऊस सुरूच राहणार आहे. मात्र 7 सप्टेंबर नंतर राज्यातील पावसाचा जोर ओसरणार असून सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.
पंजाब डख अंदाज ; परतीचा पाऊस कधीपासून…
राज्यात 12 सप्टेंबर नंतर परतीच्या पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज डख यांनी दिलाय… 12 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर तसेच सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यातही परतीचे चांगले पाऊस होणार आहेत.
यंदा परतीचा पाऊस राज्यात चांगला बरसणार आहे. 12,13 सप्टेंबर पासून राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात होणार असून परतीच्या पावसामुळे काही ठिकाणी अतीव्रुष्टी होईल अशी माहिती पंजाब डख यांनी दिली आहे.