Panjab dakh andaj today ; पाऊस घेनार विश्रांती, या तारखेनंतर पुन्हा जोरदार
आज 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या काळात पावसाचा जोर काहीसा कमी होईल. मात्र, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, आणि भंडारा या भागात पाऊस सुरूच राहील असा अंदाज पंजाब डख यांनी व्यक्त केलाय.
Panjab dakh andaj today पुन्हा पाऊस जोर धरनार…
पंजाब डख यांच्या अंदाजानुसार 4 ते 7 सप्टेंबर या कालावधीत राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात होईल. विदर्भातील सर्व जिल्हे, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबाबत पुन्हा सविस्तर माहिती दिली जाईल..(पंजाब डख)
पंजाब डख यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिलाय की…31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या काळात पाऊस कमी असल्याने, मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी शेतीची कामे पूर्ण करून घ्यावीत. कारण पुन्हा 4 सप्टेंबर पासून राज्यात पाऊस जोर धरनार आहे.
राज्यातील काही भागात यंदा खुप कमी पाऊस आहे, मात्र सप्टेंबर महिन्यातील परतीच्या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर आणि सोलापूरसारख्या अवर्षणग्रस्त भागांमध्ये तसेच बीड जिल्ह्यात ओढे, नाले आणि तळी भरून निघण्याची शक्यता आहे. यामुळे पाण्याची टंचाई दूर होण्यास मदत होईल असे डख साहेबांनी सांगितले…