पंजाबराव डख ; परतीचा पाऊस धरनार जोर,या तारखेपासून
पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार १३ सप्टेंबरपासून परतीच्या पावसाला सुरुवात होईल आणि १३ ते १७ सप्टेंबर दरम्यान हा परतीचा पाऊस राज्यात जोरदार पडनार आहे.राज्यात 13 आँक्टोंबरपर्यंत परतीचा पाऊस राहील आणि त्यानंतर पाऊस निघून जाईल…
१२ सप्टेंबरला हिंगोली, नांदेड, वाशिम, यवतमाळ, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात होईल…१३ सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडनार आहे..
बीड, नांदेड, लातूर, सोलापूर, आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये या काळात चांगला पाऊस होईल असा अंदाज पंजाबरावांनी दिलाय…
या पावसामुळे अनेक मोठी धरणे भरून निघतील आणि पावसाचा सोडावे लागेल, जसे की जायकवाडी, येलदरी, सिद्धेश्वर, मांजरा, दुधना आणि निळवंडे हि सगळे भरतील – डख साहेब
सप्टेंबरमध्ये आणखी एक परतीचा पाऊस २५ ते २८ सप्टेंबर दरम्यान पडनार आहे.ऑक्टोबरमध्येही १० ते १३ ऑक्टोबर दरम्यान परतीचा मोठा पाऊस येण्याची शक्यता आहे असेही पंजाबराव म्हनाले…