आजचा हवामान अंदाज ; पुढील काही तासात या जिल्ह्यात मुसळधारेचा अलर्ट

आजचा हवामान अंदाज ; पुढील काही तासात या जिल्ह्यात मुसळधारेचा अलर्ट

 

पुढील काही तासात उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्हे तसेच कोकण घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलात..उर्वरित महाराष्ट्रात ढगाळलेलं वातावरण आणि तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 

आज कोनत्या जिल्ह्यात पावसाचा ईशारा देण्यात आलाय आणि कुठे पावसाची उघडीप राहील पाहुयात सविस्तर…

 

मराठवाडा ; जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर बिड,परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात कोनताही अलर्ट नाही फक्त तुरळक ठिकाणी हलका पाऊस होईल…

उत्तर महाराष्ट्र ; नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा आँरेंज तर जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाचा यल्लो अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आला आहे.

घाटमाथा आणि संपूर्ण केली कोकणात मुसळधार तर काही ठिकाणी अतीमुसळधार पावसाचा ईशारा देण्यात आला आहे…

 

विदर्भातील सर्वच जिल्हे, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर,सोलापूर सांगली तसेच मराठवाड्यातील जालना संभाजीनगर वगळता ईतर जिल्ह्यात हवामान कोरडे राहील तुरळक ठिकाणीच हलका पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय.

Leave a Comment