पंजाब डख live ; एवढे दिवस उघाडीनंतर राज्यात पुन्हा धोधो पाऊस..पहा सविस्तर

पंजाब डख live ; एवढे दिवस उघाडीनंतर राज्यात पुन्हा धोधो पाऊस..पहा सविस्तर

 

हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी राज्यात पावसाची उघाड कधीपर्यंत राहील आणि पुन्हा पावसाला सुरुवात कधी होईल याबाबत अंदाज व्यक्त केला आहे. पंजाबरावांनी दिलेला संपूर्ण आँगष्ट आणि सप्टेंबरचा अंदाज आपण या लेखात सविस्तर पाहुया…

 

पंजाब डख live ; राज्यात २१ ऑगस्ट ते २६ ऑगस्टपर्यंत राज्यात हवामान कोरडे राहील आणि पावसाची उघडीप राहील…तरीही स्थानिक वातावरणामुळे काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो, परंतु सध्या मोठ्या पावसाची शक्यता नाही. या कालावधीचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे, उदा. फवारणी, करून घ्यावी असा सल्ला पंजाब डख यांनी दिला आहे.

 

पंजाब डख live ; पुन्हा पावसाला सुरुवात कधी ?

 

पंजाब डख यांच्या अंदाजानुसार २६ ऑगस्टनंतर पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. विशेषत २७, २८ आणि २९ ऑगस्टदरम्यान राज्यात जोरदार पाऊस पडेल, त्यातही विदर्भात पावसाचे प्रमाण जास्त असेल. सप्टेंबर महिन्यातही पावसाचे सत्र सुरूच राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाच्या उघडीपेनुसार शेतीची कामे करावीत, असा सल्ला डख यांनी दिला आहे.

 

पंजाब डख यांनी जायकवाडी धरणाच्या स्थितीबद्दलही माहिती दिली आहे. नाशिक आणि गंगापूर धरणातून पाणी सोडल्यामुळे जायकवाडी धरण ९७% भरले आहे. गोदावरी नदीतून येणाऱ्या पाण्यामुळे पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपली जनावरे आणि शेतीतील वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन पंजाब डख यांनी केले आहे.

 

Leave a Comment