पंजाब डख ; पाऊस घेनार विश्रांती, या तारखेपासून परतीचा पाऊस धरनार जोर
सप्टेंबर महिन्यात पाऊस कसा राहील, तसेच परतीच्या पावसाला सुरुवात कधी होईल याबाबत अंदाज पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे. पंजाब डख यांनी 2 सप्टेंबर रोजी दिलेला हवामानाचा अंदाज आपण पाहूयात…
२ आणि ३ तारखेला विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. त्यानंतर, ४ ते ११ सप्टेंबर या कालावधीत हवामान कोरडे राहील आणि सुर्यदर्शन होईल. शेतकऱ्यांसाठी ही वेळ महत्त्वाची आहे. या काळात शेतीतली कामे जसे की, कीटकनाशकांची फवारणी, मूग आणि उडीद यांसारख्या पिकांची काढणी आणि उसाला खत घालणे यांसारखी कामे पूर्ण करण्याचा सल्ला पंजाब डख यांनी दिला आहे. त्यानंतर, ११ सप्टेंबरपासून या भागात पुन्हा पाऊस परत येनार आहे आहे.
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिकसारख्या भागांत ४, ५ आणि ६ सप्टेंबरला जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे. यानंतर, ७ सप्टेंबरनंतर हवामान स्वच्छ होईल आणि १३ सप्टेंबरपर्यंत हवामान कोरडे राहील , जेणेकरून शेतकरी त्यांची कामे पूर्ण करू शकतील.
पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांत २ आणि ३ सप्टेंबरला हलक्या सरींची अपेक्षा आहे. ४ ते १२ सप्टेंबर या काळात हवामान कोरडे आणि स्वच्छ राहील. मुंबईमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्याची तीव्रता ५ आणि ६ सप्टेंबरला जास्त असेल.
राज्यात १३ सप्टेंबरपासून ‘परतीचा’ पावसाचा जोरदार टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे. हा पाऊस विशेषतः अहमदनगर, सांगली, सोलापूर, पुणे आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत जास्त प्रमाणात पडेल असा अंदाज पंजाब डख यांनी दिला आहे.
११ ते १७ सप्टेंबर या कालावधीत परतीचा पाऊस येनार आहे, मागील पावसापेक्षा हा पाऊस जास्त असेल. तसेच सप्टेंबर च्या शेवटच्या आठवड्यातही पुन्हा परतीचा पाऊस जोरदार बरसनार आहे अशी माहिती पंजाब डख यांनी दिली आहे.